एसटी बस खुडे वस्तीजवळ उलटली   

तीन विद्यार्थिनी जखमी 

भोर,(प्रतिनिधी) : महुडे ते भोर असा प्रवास करणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस समोरच्या चारचाकी वाहनाला साईड देताना रस्त्याच्या कडेला घसरून पलटी झाली. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र शाळेतील ३ मुली किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले. ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास महुडे बुद्रुक जवळच्या खुडे वस्तीजवळ घडली. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून साईडपट्ट्यांची वाट लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी ३ वाजता भोर वरून महुडे एसटी निघाली. महुडे येथून परत येताना ६ शालेय विद्यार्थिनी बसमध्ये होत्या. तर समोरून एका खासगी कंपनीची बस येत होती. दरम्यान रस्त्याच्या अरूंद भागात समोरच्या बसला साईड देताना एसटी साईडपट्टीवरून घसरून पलटी झाली. खबर मिळताच स्थानिकांनी व महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी बस उभी केली.

Related Articles