गोंदवल्यात आज वाहतुकीत बदल   

सातारा,(प्रतिनिधी) : श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात आज (गुरुवारी) गुरुपौर्णिमा उत्सव होणार आहे. उत्सवासाठी दरवर्षी महाराष्ट्रातून ७० ते ८० हजार भाविक येत असतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी गोंदवले बुद्रुक गावातून जाणारी वाहतूक पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशाने वळविण्यात आली आहे.
 
गोंदवले बुद्रुकमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आहेत. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू असते, तसेच रस्त्याच्या दुतर्फा लागणारी छोटी वाहने व भाविकांची गर्दी यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत वाहतूक सुरळीत राहावी व भाविकांसह स्थानिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी गुरुवारी सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत सातारा ते पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
 
वाहतूक मार्गातील बदल
 
सातारा बाजूकडून पंढरपूर, अकलूजकडे जाणारी सर्व वाहने खांडसरी चौक येथून दहिवडी, राणंद, मार्डी, म्हसवडमार्गे पंढरपूर, अकलूजकडे जातील.
पंढरपूर, अकलूजवरून सातारा बाजूकडे जाणारी सर्व वाहने म्हसवड, मायणी, खांडसरी चौक येथून सातार्‍याकडे किंवा म्हसवड, शिंगणापूर, फलटणमार्गे सातारा अशी जातील. पिंगळी बुद्रुक येथील खांडसरी चौक ते गोंदवले बुद्रुक येथील अप्पा महाराज चौकापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.

Related Articles