टोल कंत्राटदाराला नियमबाह्य मुदतवाढ; ३ हजार कोटींचे नुकसान   

मुंबई,  (प्रतिनिधी) : मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना व शासकीय बस सेवांना टोलमाफी दिल्यामुळे खासगी कंत्राटदाराला नियमबाह्यपणे मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) अंदाजे ३ हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत केला. 
 
या संदर्भात नाना पटोले यांनी मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव, तसेच एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांविरोधात विधानसभेत हक्कभंगाची सूचना दाखल केली आहे. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या निर्णयात ९१०.९२ कोटींची नुकसान भरपाई नमूद केली असली तरी संबंधित कंत्राटदाराने आपल्या पत्रात कुठलीही आकडेवारी दिलेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाची दिशाभूल करण्यात आली असून, खासगी कंपनीला बेकायदेशीर लाभ मिळवून देण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. 

Related Articles