ट्रम्प यांचा सहा देशांवर ’टॅरिफ’ बॉम्ब   

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा देशांवर नवीन कर (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली आहे. या देशांमध्ये फिलीपिन्स, इराक, मोल्दोव्हा, अल्जेरिया, लिबिया आणि ब्रुनेई यांचा समावेश आहे. हा नवीन कर १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा ट्रम्प यांनी दक्षिण कोरिया आणि जपानसह १४ इतर देशांवर कराची घोषणा केली आहे. आता या सहा नवीन देशांना देखील कर यादीमध्ये समाविष्ट केले आहे. 
 
ट्रम्प यांनी या देशांच्या नेत्यांना याबाबत अधिकृत पत्रे पाठवली आहेत. ज्यात त्यांनी नवीन शुल्कांची संपूर्ण माहिती दिली आहे. या निर्णया अंतर्गत, सर्वोच्च शुल्क ३० टक्के निश्चित करण्यात आले आहे. जे इराक, अल्जेरिया आणि लिबियावर लागू होईल. ट्रम्प प्रशासनाला असा विश्वास आहे की अमेरिकन व्यापार हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल गरजेचे आहे.
 
एक दिवस आधी, ट्रम्प यांनी ब्रिक्स देश ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेतून येणार्‍या वस्तूंवर १० टक्के कर लादण्याची योजना जाहीर केली होती. या हालचालीमुळे अमेरिका आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील व्यापार तणाव आणखी वाढू शकतो. या सर्वांमुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण व्यापार धोरणांमधील या बदलांचा आंतरराष्ट्रीय व्यवसायावर मोठा परिणाम होऊ शकतो.

कोणत्या देशांवर किती टॅरिफ?

फिलीपिन्स : २५ टक्के
ब्रुनेई : २५ टक्के
मोल्दोव्हा : २५ टक्के
इराक : ३० टक्के 
अल्जेरिया : ३० टक्के
लिबिया : ३० टक्के
 

Related Articles