पाकिस्तानात २७ युट्यूब चॅनेलवर बंदी   

इस्लामाबाद : दिशाभूल करणारी आणि बनावट माहिती प्रसारित केल्याबद्दल पाकिस्तानच्या एका न्यायालयाने माजी पंतधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या चॅनेलसह २७ युट्यूब चॅनेलवर बंदी घातली.  
 
इस्लामाबादस्थित मॅजिस्ट्रेट न्यायालयाने राष्ट्रीय सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेच्या तक्रारीवरून ही कारवाई केली. या २७ चॅनल्समध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे पत्रकार मतिउल्ला जान, वजाहत खान, अहमद नुरानी आणि असद अली तूर, माजी अँकर इम्रान रियाझ, ओर्या मकबूल, साबीर शाकीर आणि मोईद पिरजादा यांचा समावेश आहे. न्यायिक दंडाधिकारी मोहम्मद अब्बास शाह यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. 

Related Articles