हिमाचलमधील जिल्हा न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी   

शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला, कुल्लू आणि नाहन येथील जिल्हा न्यायालयांना बुधवारी बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला. या धमकीची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथकांनी शिमला, नाहन, कुल्लू आणि रामपूर येथील जिल्हा न्यायालय परिसरात तातडीने रिकामा केला. तसेच, संपूर्ण परिसराची कसून पाहणी करण्यात आली. श्वान पथकेदेखील यावेळी न्यायालय परिसरात होती. 
 
न्यायालयाच्या इमारती आणि आजूबाजूच्या परिसराची कसून चौकशी केल्यानंतर स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत, असे अधिकार्‍यांनी सांगितले. शिमला आणि रामपूरसह अनेक न्यायालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ईमेल प्राप्त झाले असल्याचे शिमलाचे पोलिस अधीक्षक संजीव कुमार गांधी यांनी सांगितले. मागील काही महिन्यांत हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय, सचिवालय आणि उपायुक्त कार्यालयांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्या सर्व खोट्या असल्याचे तपासणीनंतर निष्पन्न झाले.

Related Articles