काश्मीरमध्ये पाऊस;उष्णतेपासून दिलासा   

श्रीनगर : काश्मीरच्या अनेक भागांत बुधवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, हवामान विभागाने पुढील ३६ तासांत काश्मीर खोर्‍यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
 
सध्या अनेक ठिकाणी  अधूनमधून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस वादळी वार्‍यासह पडत आहे. पुढील दोन दिवस हे चित्र असेच राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात, अशी शक्यतादेखील वर्तविली जात आहे. पावसामुळे नद्या आणि नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल. तसेच, सखल भागात पाणी साचेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

Related Articles