बिहारमध्ये मतदार यादी सुधारणांविरोधात निदर्शने   

पाटणा : मतदार यादी सुधारणेविरोधात बिहारमधील नागरिक आक्रमक झाले असून, बुधवारी राज्यात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पाटण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, राजदचे तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत चक्का जाम केला. 
 
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादी सुधारणेविरोधात इंडिया आघाडीने बुधवारी बिहारमध्ये चक्का जाम केला. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. जिल्हा मुख्यालयांमध्ये निदर्शने झाली. राहुल आणि तेजस्वी पाटण्यातील आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी आयकर चौकातून वीरचंद पटेल पथ आणि शहीद स्मारकामार्गे निवडणूक आयोग कार्यालयाकडे फेरी काढली. राहुल यांसोबत सीपीआयचे डी राजा, सीपीआय(एम) चे एम. ए. बेबी आणि सीपीआय (एमएल)चे दीपांकर भट्टाचार्य हेही सहभागी झाले होते.
 
दरम्यान, अनेक भागात रेल्वे आणि रस्ते वाहतूक रोखण्याचे प्रयत्न झाले.महामार्गांवर टायर जाळण्यात आले. त्यामुळे मुझफ्फरपूर, नवादा, अरवल, जहानाबाद आणि दरभंगा सारख्या जिल्ह्यांमध्ये वाहतूक कोलमडली. अनेक जिल्ह्यांमध्ये, आरजेडी, काँग्रेस आणि तीन डाव्या पक्षांच्या स्थानिक आमदारांनी निदर्शने केली. महात्मा गांधी सेतूवरही मोठी वाहतूक कोंडी झाली होती. 
 

Related Articles