तहव्वूरला १३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी   

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याची न्यायालयीन कोठडी दिल्ली न्यायालयाने १३ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. याआधी सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत काल संपणार होती. त्यामुळे, तहव्वूर याला काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी तहव्वूर याच्या कोठडीत वाढ करण्याचा आदेश दिला. पाकिस्तानी वंशाच्या तहव्वूर याने डेव्हिड कोलमन हेडली ऊर्फ दाऊद गिलानी याच्या मदतीने २६/११ च्या हल्ल्याची आखणी केली होती. भारताच्या विनंतीनंतर अमेरिकेने तहव्वूर याला ४ एप्रिल रोजी भारताकडे सोपविले. त्या आधी, तहव्वूर याने अमेरिकेतील न्यायालयात वारंवार धाव घेतली होती. दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यावर, न्यायालयात १३ एप्रिल रोजी निर्णय देणार आहे. 

Related Articles