आयटीआय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर   

शनिवारपर्यंत घेता येणार प्रवेश 

पुणे : यंदा राज्यातील ९९२ आयटीआय संस्थांमध्ये एकूण एक लाख ४६ हजार ८२० जागा उपलब्ध आहेत. यात सरकारी संस्थांमधील ९४ हजार २९६ जागांचा आणि खासगी संस्थांमधील ५२ हजार ५२४ जागांचा समावेश आहे. त्यासाठी जवळपास एक लाख ७३ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.
 
महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रवेशाकडे जास्त कल आहे. यंदा आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यभरातून तब्बल पावणे दोन लाख अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ८२ हजार ८२२ विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या संस्थेत १२ जुलैपुर्वी आपल्या प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
 
यंदा राज्यातील ९९२ आयटीआय संस्थांमध्ये एकूण एक लाख ४६ हजार ८२० जागा उपलब्ध आहेत. यात सरकारी संस्थांमधील ९४ हजार २९६ जागांचा आणि खासगी संस्थांमधील ५२ हजार ५२४ जागांचा समावेश आहे. त्यासाठी जवळपास एक लाख ७३ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.
 
पहिल्या यादीत राज्यभरातून ८२ हजार ८२२ विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट झाली आहेत. यात सरकारी संस्थांमधील ९४ हजार २९६ जागांपैकी ६६ हजार ६८० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. तर खासगी संस्थांमध्ये १६ हजार १४२ विद्यार्थ्यांना जागा मिळणार आहेत. एकूण जागांपैकी ६१.५२ टक्के जागा पहिल्या यादीत निश्चित करण्यात आल्या आहेत.

Related Articles