स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; १६ मुलींची सुटका   

लोहगाव : विमानतळ पोलिस ठाणाच्या हद्दीत पोरवाल रस्ता धानोरी परिसरातील मसाजच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना देहविक्री व्यवसायासाठी प्रवृत्त करणार्‍या एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून पाच पीडितेंची येथून सुटका करण्यात आली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा अंतर्गत विमानतळ पोलिस ठाण्याचे अधिकार्‍यांनी ही कारवाई केली आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात स्पा मालक, मॅनेजर महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. किरण बाबूराव आडे ऊर्फ अनुराधा बाबूराव आडे (वय २८, रा. राघे निवास, लेन क्र. ६, खराडी) असे अटक झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार रेश्मा कंक यांनी तक्रार दिली. 
 
पोरवाल रोड धानोरी परिसरातील आयजी धाम इमारतीत स्पा सेंटरच्या नावाखाली अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पंचांना घेऊन पथकाने लक्स स्पा सेंटरमध्ये छापा टाकला असता तेथे वेश्या व्यवसाय करणार्‍या दोन अल्पवयीन मुलींसह पाच तरुणी आढळून आल्या.स्पा मॅनेजर आरोपी महिला आडे या पीडित तरुणींना जादा पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होती. दरम्यान, सर्व मुलींना सुरक्षित पद्धतीने सोडवून बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे.
 
परिमंडळ ४ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये, विमानतळ पोलिसांनी एका स्पा सेंटरवर छापा टाकून १६ मुलींची सुटका केली. त्यात १० परदेशी आणि २ भारतीय अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक आणि जागेचा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव, सह. पोलिस निरीक्षक समीर करपे, पोलिस उपनिरीक्षक नितिन राठोड, उपनिरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केली.

Related Articles