मुशीर खानचे शानदार शतक   

मुंबई : शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासह महिला क्रिकेट संघ, १९ वर्षांखालील भारतीय संघासोबतच मुंबई इमर्जिंग टीम सध्या इंग्लंड दौर्‍यावर आहे. मुंबईच्या संघाकडून सरफराज खानचा धाकडा भाऊ मुशीर खान याने इंंग्लंडच्या मैदानात धमाकेदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंग्लंड दौर्‍यात त्याने सलग तीन शतके झळकावली आहेत. 
 
लोबॉरो यूसीसीई संघाविरुद्धच्या तिसर्‍या सामन्यात मुशीर खान याने ११६ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकारासह ८७.९३ च्या स्ट्राइक रेटनं १०२ धावांची खेळी केली.  याआधी  चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यात  मुशीर खान याने १२७ चेंडूत १२५ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीत ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.  ३० जूनला नॉटिंघमशायर सेकंड दख विरुद्धच्या लढतीत त्याने १२७ चेंडूत १२३ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. फलंदाजीशिवाय मुशीर खान याने गोलंदाजीतही आपला जलवा दाखवून दिला आहे. दुसर्‍या सामन्यात त्याने १० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्याचे पाहायला मिळाले. उजव्या हाताने फलंदाजी करणारा मुशीर खान डावखुर्‍या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. 

Related Articles