दुचाकीच्या अपघातात तरुण जखमी   

पुणे : डेक्कन जिमखाना परिसरातील भुयारी मार्गाच्या कठड्यावर भरधाव दुचाकी आदळल्यामुळे दुचाकीस्वार थेट भुयारी मार्गात कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. धवल नारखेडे (वय २२, द्वारिकानगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलीस शिपाई गणेश डोईफोडे याप्रकरणी यांनी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Related Articles