डीएसके कंपनीतील गुंतवणूकदारांनी १५ जुलैनंतर उपस्थित राहावे   

गुन्हे शाखेचे आवाहन

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकादारांना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात यादी दुरूस्तीच्या अनुषंगाने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या गुंतवणुकदारांची यादी तयार करण्यात आली होती. त्याच्या दुरूस्तीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले.
 
डीएसके प्रकरणातील गुंतवणुदारांनी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात १० ते १२ जुलै दरम्यान एफडी धारक, १४ ते १५ जुलै एफडी धारक व एसटीएस धारक तर १६ ते १८ जुलै एसटीएलधारक यांनी प्रोव्हिजनल लिस्टमधील दुरुस्तीकरिता हजर राहणेबाबत आवाहन करण्यात आले होते. तांत्रिक कारणामुळे हे काम शक्य ठरवून दिलेल्या दिवशी शक्य होत नसल्याने गुंतवणुकदारांनी १५ जुलैनंतर उपस्थित रहावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांनी केले आहे.
 
गुंतवणुकदारांनी १५ जुलैनंतर टेलीग्राम मोबाइल अ‍ॅप (EOW PUNE DSK FD D­T­, mydskfdbot) जिल्हाधिकारी कार्यालय संकेतस्थळ pune.gov.in), पोलीस आयुक्त संकेतस्थळ punepolice.gov.in येथे सुधारित यादी पहावी. त्यानंतर ठरवून दिलेल्या दिनांकानुसार शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले.

Related Articles