हवाई दलाचे विमान राजस्तानमध्ये कोसळले   

दोन वैमानिकांचा मृत्यू

जयपूर : राजस्तानच्या चुरू जिल्ह्यात बुधवारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार विमान कोसळले. या विमानात दोन वैमानिक होते. या दोघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.जॅग्वार विमान नियमित प्रशिक्षणादरम्यान काल चुरुजवळ कोसळले, असे हवाई दलाने निवेदनात म्हटले आहे.या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला असून सार्वजनिक मालमत्तेचे  कोणतेही नुकसान झाले नाही, असेही यात नमूद केले आहे. दरम्यान, राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. काल दुपारी सव्वाएकच्या सुमारास रतनगढ जिल्ह्यातील भानोदा गावात एका शेतात हे विमान कोसळले, असे राजलदेसर पोलिस अधिकारी कमलेश यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. 

Related Articles