E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
भारतासह ब्रिक्स देशांना १० टक्के अतिरिक्त कर
Samruddhi Dhayagude
09 Jul 2025
डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ब्रिक्स देशांवर कर लादण्याची घोषणा केली आहे. ब्रिक्स देशांवर लवकरच १० टक्के कर लादला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे.
व्हाईट हाऊस येथे कॅबिनेट अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी ही घोषणा केली.ट्रम्प म्हणाले, ब्रिक्सची स्थापना आपल्याला दुखावण्यासाठी, आपल्या डॉलरची अधोगती करण्यासाठी करण्यात आली होती. डॉलर सर्वात श्रेष्ठ आहे. आपण ते असेच ठेवूया. जर नागरिकांना आव्हान द्यायचे असेल तर ते करू शकतात. पण त्यांना त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल. मला वाटत नाही की त्यापैकी कोणालाही ही किंमत मोजावीशी वाटेल, असे त्यांनी नमूद केले.
ट्रम्प यांच्या विधानावरून हे स्पष्ट झाले आहे, की अमेरिका ब्रिक्स गटातील ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांविरुद्ध कठोर व्यापारी भूमिका घेणार आहे. ब्रिक्स समूह जागतिक व्यापार आणि राजनैतिकतेमध्ये आपली पकड मजबूत करत असताना आणि अनेक नवीन देशांनीही त्यात सामील होण्यास रस दाखवलेला असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतासह ब्रिक्स देशांसाठी अमेरिकन बाजारपेठांमध्ये प्रवेश महाग होऊ शकतो, ज्यामुळे द्विपक्षीय व्यापार संबंधांवर परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, २ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी भारतासह (२६ टक्के) विविध देशांना प्रत्युत्तर शुल्क लागू केले जाईल आणि व्यापार करार करण्यासाठी ९ जुलै अंतिम तारीख असेल, अशी घोषणा केली होती.
तांब्याच्या आयातीवर लादणार ५० टक्के कर
ट्रम्प यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. अमेरिका तांब्याच्या आयातीवर ५० टक्के कर लादणार आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या कॅबिनेट बैठकीत ट्रम्प यांनी, आम्ही तांब्यावर कारवाई करत आहोत, असेही सांगितले. यासोबतच ट्रम्प यांनी औषधांच्या आयातीबाबत मोठे विधान केले. अमेरिका लवकरच औषधांवर मोठी घोषणा करेल आणि किमान एक वर्षानंतर त्यांच्यावर २०० टक्क्यांपर्यंतचे शुल्क लादले जाऊ शकते, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार दृष्टिपथात आल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. ब्रिटन आणि चीनसोबत करार केला आहे. आता भारतासोबतही तो करु. अनेक देशांना आम्ही भेटलो आहे. पण, जे करार करणार नाहीत, अशांना पत्रे पाठवली आहेत.
Related
Articles
उपमुख्यमंत्री शिवकुमारांचे नाव घेण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा नकार
21 Jul 2025
टिमवित ‘लोकमान्य वेब रेडिओ’ नव्या केंद्राचे उद्घाटन
24 Jul 2025
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात
23 Jul 2025
नागपुरात भाजीपाल्याच्या आडून गांजाची विक्री
20 Jul 2025
बिहारच्या विधानसभेमध्ये मतदार यादीवरुन गोंधळ
21 Jul 2025
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या
22 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)