नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज (बुधवारी) व्यापारी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. शाळा, टपाल, विमा, बँकेसह विविध क्षेत्रांतील सुमारे २५ कोटी कर्मचार्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला. देशातील १० व्यापारी संघटनांनी केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी बंदचे आवाहन केले. सरकारचे धोरण कामगार, शेतकरी, देशविरोधी आणि भांडवलशाही समर्थक असल्याचा आरोप संघटनांचा आहे. बंद यशस्वी करण्यासाठी संघटनांनी गेल्या काही महिन्यांपासून तयारी केली आहे.
Fans
Followers