फास्ट टॅगचे संकलन २० हजार कोटींवर   

नवी दिल्ली : राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर तीन महिन्यांत  फास्ट टॅगद्वारे टोलवसुलीचे प्रमाण १९.६ टक्के वाढले आहे २० हजार ६८२ कोटींचे संकलन झाले, अशी माहिती राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनने दिली. 
 
एप्रिल ते जून दरम्यान १ हजार १७३ दशलक्ष जणांनी फास्ट टॅगचा वापर केला असून वर्षभरापूर्वी याच कालावधीत १ हजार ९.९७ दशलक्ष जणांनी वापर केल्याचे उघड झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलच्या दरात एक एप्रिलपासून सरासरी ४ ते ५ टक्के वाढ केली.

Related Articles