एम.ई. परीक्षेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करता येणार   

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठ स्तरावर घेतलेल्या परीक्षांतर्गत छायांकित प्रत आणि पुनर्मूल्यांकन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील उन्हाळी सत्र परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षांमधील एम. ई. (२०१७ पॅटर्न) या अभ्यासक्रमांचा निकाल नुकताच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे.  या परीक्षेतील उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांना ११ ते २० जुलै दरम्यान अर्ज करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
 
विद्यार्थ्यांना दिलेल्या कालावधीत उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी सशुल्क अर्ज करावा लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना छायांकित प्रत २१ जुलैनंतर उपलब्ध होतील. छायांकित प्रत उपलब्ध होताच विद्यार्थ्यांना गुणपडताळणीत काही शंका किंवा एखादा प्रश्न तपासला नसेल, असे आढळल्यास त्यांनी गुणपडताळणीसाठी उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत उपलब्ध होताच पाच दिवसात विनाशुल्क अर्ज करावा.
 
विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास त्यांनी छायांकित प्रत मिळाल्यावर पुनर्मूल्यांकनासाठी सशुल्क अर्ज करावेत. त्यानंतर गुणपडताळणीचा काही भाग तपासायचा राहून गेला असल्यास त्याची खातरजमा, किंवा पुनर्मूल्यांकन झाल्यानंतर अनुरूप गुणप्रदर्शन विद्यार्थ्यांच्या ग्रेडशिटमध्ये प्रदर्शित होतील.तसेच गुणबदलाची पुन्हा खात्री करायची असल्यास विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत पुन्हा ऑनलाइन सशुल्क अर्ज करावा लागेल, त्यानंतर प्रत्यक्ष गुणबदलाची छायांकित उत्तरपत्रिका विद्यार्थ्यास त्यांच्या प्रोफाईलमध्ये प्रदर्शित होईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी सांगितले आहे.

Related Articles