पराभवाच्या भीतीमुळे मराठीचा वाद उकरुन काढला   

दुबे यांची राज यांच्यावर पुन्हा टीका

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मंगळवारी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच कार्यकर्त्यानी अमराठी नागरिकांवर हल्ला करु नये, असा इशारा दिला आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीतील पराभव दिसू लागल्याने राज यांनी भाषेचा वाद उपस्थित केल्याचा आरोपही त्यांनी केला. तुमच्यात धमक असेल उर्दू, तामिळ किंवा तेलगू भाषक नागरिकांना मारावे, असे आव्हान दुबे यांनी सोमवारी दिले. काल त्यांनी राज यांना पुन्हा लक्ष्य केले. २००७ मध्ये महाराष्ट्रात बिहारी विद्यार्थ्यावर हल्ला झाल्यानंतर आणि हिंसक घटनानंतर बिहारमध्ये त्याचे पडसाद उमटले होते. तेथे जोरदार निदर्शने झाली होती. याबाबतचा तपशील विकलिक्सच्या हवाल्याने दिला. या संदर्भातील स्कीनशॉट पुरावा म्हणून त्यांनी टाकला आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज यांना जनसमर्थन मिळत नाही तेव्हा ते गुंडगिरी करतात. २००७ ची घटना त्याचे उदहारण आहे. 

Related Articles