सरनाईकांची मनसे- ठाकरे गटावर टीका   

मुंबई : मनसे, मराठी एकीकरण समिती व शिवसेनेच्या (ठाकरे) नेतृत्वाखालील या आंदोलनाबाबत प्रताप सरनाईक म्हणाले, ही सगळी राजकीय नौटंकी असते. बर्‍याचदा आंदोलक काय करतात याची त्यांना कल्पना नसते. सगळं काही पूर्वनियोजित नसतं. त्यामुळे मी कोणाला दोष देणार नाही. मात्र, मी आधीच सांगितलं आहे की मी मंत्री किंवा आमदार नंतर, मी आधी मराठी आहे. मराठी लोकांनी मोर्चा आयोजित केला असेल किंवा त्यांचं आणखी काही काम असेल तर त्याला समर्थन द्यायला पाठिंबा द्यायला जाणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणूनच मी इथे आलो. मी माझं कर्तव्य समजून आलो आणि आता मी माझ्या कामासाठी निघालो आहे.
 

Related Articles