जेजुरी गडावर वृक्षारोपण   

जेजुरी,(प्रतिनिधी) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर वृक्षारोपण करण्यात आले.  या परिसरामध्ये असलेले श्री सदस्य या लावलेल्या झाडांची काळजी घेणार असून त्याचे संवर्धनही करणार आहेत. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख पद्मश्री, महाराष्ट्र भूषण डॉ. दत्तात्रय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण जगभरामध्ये विविध देशांमध्ये तसेच आपल्या देशामध्ये तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्यात येत आहे. 
 
यावेळी जेजुरी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चारुदत्त इंगवले, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले, श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीचे विश्वस्त अभिजित देवकाते, मंगेश घोणे, पांडुरंग थोरवे, अनिल सौंदाडे, पोपटराव खोमणे, विश्वास पानसे, राजेन्द्र खेडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली. जेजुरी गडाच्या परिसरामध्ये वड, पिंपळ, चिंच, शिसम, करंज, बहावा, औदुंबर, आपटा, कांचन, कडुलिंब, जांभूळ, आवळा अशा विविध प्रकारची जंगली, फळझाडे तसेच आयुर्वेदिक वनौषधी असे मिळून एकूण  ५५० झाडांची रोपे लावण्यात आली. 
 

Related Articles