कोयना धरणाचे दरवाजे पुढील २४ तासांत उघडण्याची शक्यता   

सातारा,(प्रतिनिधी) : पश्चिम घाटात आणि कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असून, त्यामुळे कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. मुसळधार पावसामुळे दिवसाला सरासरी २ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ होत असून, सध्या धरणात ७१.०० टीएमसी साठा झाला आहे.
 
धरणाची गेट लेव्हल ७३.५० टीएमसी आहे. अवघ्या २.५० टीएमसी अंतरावर ही मर्यादा गाठली जाणार असल्याने पुढील २४ तासांत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
गेट लेव्हल गाठल्यावर वक्रदरवाजांना पाणी टेकते आणि धरणातून नियंत्रित विसर्ग सुरू केला जातो. कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी सांगितले की, दरवाजे उघडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जातील, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये.

Related Articles