E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पिंपरी महापालिकेच्या विकास आराखड्यात सुधारणा करणार
Wrutuja pandharpure
09 Jul 2025
कोणावरही अन्याय होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
पिंपरी
: पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारूप विकास आराखड्यात नागरिकांच्या राहत्या घरांवर रस्त्यांची आरक्षणे टाकली असतील तर ती काढली जातील. अनावश्यक आरक्षणाबाबतही निर्णय घेतला जाईल. आराखडा अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे आल्यानंतर त्यात आवश्यक ते बदल केले जातील. कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही नगरविकास विभागाची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
खासदार बारणे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे, नगरविकास विभागाचे सचिव असीम गुुप्ता यांची भेट घेतली. महापालिकेच्या विकास आराखड्याबाबत असलेला नागरिकांचा रोष शिंदे यांना सांगितला. आराखड्याविरोधात नागरिकांच्या सुरू असलेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती दिली.राज्य सरकार जनतेला दिलासा देणारा बदल आराखड्यात करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारूप विकास आराखडा 15 मे 2025 रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. १४ जुलैपर्यंत हरकती-सूचना मांडता येणार आहेत. आत्तापर्यंत 20 हजारांहून अधिक हरकती आल्या आहेत.
खासदार बारणे म्हणाले, विकास आराखड्यात चुकीच्या पद्धतीने आरक्षणे टाकली आहेत. अधिकार्यांनी ताळतंत्र बाळगले नाही. शहराचा आढावा घेतला नाही. महापालिका आजपर्यंत आरक्षणे ताब्यात घेऊ शकली नाही. तीच आरक्षणे पुन्हा कायम ठेवली आहेत. २५ वर्षांत आरक्षणे ताब्यात घेण्यात यश आले नाही. तर, प्रशासन आता कसे ताब्यात घेणार आहे. कार्यालयात बसून आराखडा तयार केला आहे.स्थळपाहणी केली नाही. निळी पूररेषा वाढविण्यात आली आहेत. राहत्या घरांवर, सोसायट्यांवर रस्ते आरक्षणे टाकली आहेत.
थेरगाव, वाल्हेकरवाडीसह चिंचवड परिसरातील हजारो नागरिक बेघर होणार आहेत. अनावश्यक, चुकीच्या पद्धतीने आरक्षणे टाकली आहेत. बांधकाम परवाने घेतलेल्या जमिनींवर आरक्षण टाकले आहे. त्यामुळे घरांवरील रस्त्यांची आरक्षणे तातडीने रद्द करावीत, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विकास आराखड्यात घरांवर रस्ते दाखविले असतील. चुकीच्या पद्धतीने आरक्षणे टाकली असतील. तर, आराखडा बदलून दुरुस्त करण्याचा संपूर्ण अधिकार नगरविकास विभागाला आहे.
हरकती, सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर अहवाल शासनाकडे येईल. त्यात घरांवरील रस्त्यांचे आरक्षण रद्द केले जाईल.त्यामुळे हरकती, सूचना नोंदवाव्यात. आराखडा शासनाकडे आल्यानंतर हरकती आम्हाला द्याव्यात. आराखड्यात कोणावरही अन्याय होणार नाही, याची सरकार काळजी घेईल. छत्रपती संभाजीनगर येथील आराखड्यातही अशाच त्रुटी झाल्या होत्या. त्यात बदल केला आहे. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये, रीतसर हरकती नोंदवाव्यात.
Related
Articles
सूरज चव्हाण यांची युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी
22 Jul 2025
मंधानाचे अर्धशतक हुकले
20 Jul 2025
पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी
25 Jul 2025
गुंतवणुकीचे आमिष दाखवून ८२ लाखांची फसवणूक
20 Jul 2025
कर्नाटकात नवीन जातनिहाय जनगणना २२ सप्टेंबरपासून
24 Jul 2025
गणेशोत्सव निर्बंधमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील : रासने
21 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)