धस यांच्या मुलाच्या मोटारीची धडक बसून दुचाकीस्वार ठार   

पारनेर (वार्ताहर) : अहिल्यानगर-पुणे मार्गावर आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या आलिशान मोटारीने एका दुचाकीस्वाराला सोमवारी रात्री धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
नितीन शेळके (वय ३४, रा. पळवे खुर्द), असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. आमदार सुरेश यांचा मुलगा सागर हा पुण्याहून नगरकडे मोटारीने तर शेळके हा पळव्याकडे दुचाकीवरुन जात होता. तेव्हा अपघात झाला. या प्रक़रणी सुपे पोलिस ठाण्यात सागरवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेळके याचे जातेगाव फाटा येथे हॉटेल सह्याद्री आहे. सोमवारी रात्री तोे हॉटेलमधील कामकाज आटोपल्यानंतर दुचाकीवरून घरी निघाला होता. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास जातेगाव फाटा येथील नगरकडे जाणारा रस्ता ओलाडताना त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच १६ डीजे ३७६५) भरधाव वेगाने नगरकडे जाणार्‍या मोटारीने (क्र. एमएच २३-२९२९) जोराची धडक दिली. ही गाडी सागर धस चालवत होता. 
 
दरम्यान, नितीन यांचे चुलत बंधू स्वप्निल शेळके हे जोशी वडेवाले यांच्या दुकानाजवळ त्याची वाट पाहत होते. ते घटनास्थळी पोहचले असता नितीन  याच्या दुचाकीस मोटारीने धडक दिल्याचे आणि तो गंभीर जखमी झाल्याचे दिसले. त्यांनी त्याला रस्त्याकडेला घेतले व चुलत भाऊ अमोल, सतिश, निलेश शेळके यांना अपघाताची माहिती दिली. 
 

Related Articles