माजी उपमहापौर विश्रांती पाडळे यांचे निधन   

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रथम माजी उपमहापौर  विश्रांती  रामभाऊ पाडळे यांचे मंगळवारी त्यांच्या मूळ गावी कांजी भोयरे (ता.पारनेर,जि. अहिल्यानगर) येथे हृदयविकाराने निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती रामभाऊ पाडळे, दोन मुले प्रशांत, प्रवीण आणि कन्या अनिता  शिंदे असा परिवार आहे.बुधवारी  सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपरी कॅम्प येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर  अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी कळविले आहे. महिला आरक्षण लागू केल्यानंतर महापालिकेत 1992 मध्ये त्या उपमहापौर होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर  त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहणे पसंत केले होते.

Related Articles