पुण्याच्या स्पृहा कुलकर्णीचे यश   

पुणे : थायलंड येथे घेण्यात आलेल्या ७व्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत पुण्याच्या स्पृहा कुलकर्णी हिने भारताचे प्रतिनिधित्व करत १२ वर्षे वयोगटात रोलर रिले तसेच रोलर स्पीड रेस या प्रकारात २ कांस्य पदक पटकावले. ही स्पर्धा १९ आणि २० जून रोजी बँकॉक, थायलंड येथे झाली.स्पृहा हिला आंतरराष्ट्रीय कोच भिकन अंबे तसेच तिचे पुणे येथील कोच दीपक चव्हाण आणि शफी शेख ह्यांचे मार्गदर्शन लाभले.स्पृहा उंड्री येथील नारायणा इ-टेक्नो स्कूल मध्ये पाचवी मध्ये शिकत आहे. पुण्यातील उंड्री येथील मार्वल आयडियल स्पेसीओ फेज १ मध्ये राहत असलेल्या स्पृहाने वयाच्या ७व्या वर्षापासून सोसायटी मधेच स्केटिंग शिकायला सुरवात केली. 
 
कोरोना काळात व्यायाम आणि एक खेळ म्हणून सुरू केलेले स्केटिंग हळू हळू स्पृहाची आवड आणि पॅशन होत गेले. एप्रिल २०२५ मध्ये संभाजी नगर येथे झालेल्या ४३व्या ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत स्पृहाने २ सुवर्ण आणि १ रौप्य पदक जिंकले आणि तिची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली.  तिच्या ह्या यशाबद्दल तिचे आई वडील ओजस्विता कुलकर्णी आणि रोहन कुलकर्णी ह्यांचा पाठिंबा असणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. सध्या स्पृहा सोसायटी मधेच सचिन शिंदे आणि दर शनिवार रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी महाराष्ट्र मंडळ येथील मोठ्या स्केटिंग रिंक वर दीपक चव्हाण आणि शफी शेख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे आणि तिला भविष्यात स्केटिंग मधेच मोठे यश मिळवायचे आहे.

Related Articles