बिहारमधील महिलांना सरकारी नोकरीत ३५ टक्के आरक्षण   

पाटणा : बिहारमध्ये कायमस्वरुपी राहणार्‍या महिलांना सरकारी नोकरीत ३५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कायमस्वरुपी वास्तव्य असलेल्या महिलांना सरकारी नोकरीत आरक्षण द्यावे, अशी मागणी वाढत चालली होती. ती सरकारने निर्णय घेऊन मान्य केल्याचे मानले जात आहे. सर्वसाधारण प्रशासन विभागाने या संदर्भातील प्रस्ताव सरकारला सादर केला होता. मंत्रिमंडळातील बैठकीत प्रस्ताव मंजूर केला. सरकारच्या नव्या धोरणामुळे राज्यात कायमस्वरुपी राहणार्‍या महिलांंना आर्थिक स्वातंत्र्य आणि नोकरीत सुरक्षा मिळेल, असे अतिरिक्त सचिव एस. सिद्धार्थ यांनी सांगितले. 

Related Articles