वडिलांना भारताकडे कसे सोपविता?   

हाफीजचा मुलगा बिलावल यांच्यावर संतापला

इस्लामाबाद : माझ्या बाबांना तुम्ही भारताकडे कसे सोपविता? असा संतप्त सवाल कुख्यात दहशतवादी हाफीज सईदचा मुलगा हाफीज सईद ताल्हा याने पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांना केला आहे. 
 
लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी म्होरक्या हाफीज सईद आणि  जैश ए महमदचा म्होरक्या मसूद अझहर यांच्या सारख्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जाईल. त्यांना पकडण्यात आनंदच आहे. अटक करुन त्यांना भारताकडे सोपविले देखील जाईल, असे विधान बिलावल भुत्तो यांनी नुकतेच  केले होते. त्यामुळे ताल्हा त्यांच्यावर प्रचंड संतापला आहे. या संदर्भातील एक चित्रफीत त्याने एक्सवर टाकली. त्यात म्हटले आहे की, असे विधान करणारे भुत्तो खरे मुस्लिम धर्मीय नाहीत.त्यांनी तातडीने माफी मागावी. 
 
माझ्या बाबांना भारताकडे सोपविण्याची भाषा ते कशी करतात ?, देशभक्त माध्यमांनी या विषयावर टीकात्मक चर्चा घडवून आणावी, असे आवाहन त्याने केले. दरम्यान, भुत्तो यांनी गेल्या आठवड्यात असेही सागितले की, मसूद अझहर कोठे आहे ? हे मला माहीत नाही. त्याची माहिती देणारे पुरावे भारताने पाकिस्तानला दिले तर त्याला अटक करण्याएवढा दुसरा आनंद नाही. दरम्यान, हाफीज सईद हा पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. ही भुत्तो यांची बाब ताल्हा याच्या जिव्हारी लागली आहे. त्याने हाफीज हा तुरुंगात नसल्याचा दावा केला आहे. या उलट भारताने अनेकदा सांगितले आहे की, दोन्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानने पोसले आहे. त्यांना आश्रय दिला असून त्यांना सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले आहे.
 

Related Articles