राफेल पाडले गेल्याचा अपप्रचारामागे चीन   

बीजिंग : ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानने भारताचे राफेल लढाऊ विमान पाडल्याचा अपप्रचार चीनने केला होता, असे फ्रान्सच्या गुप्तचर अधिकार्‍यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षावेळी भारताचे राफेल पाडल्याची अफवा चीनच्या दूतावासाकडून मुद्दाम पसरवली गेली होती. तसेच अपप्रचार देखील मोठा केला होता, असे फ्रान्सच्या गुप्तचर संघटनेने उघड केले आहे. या माध्यमातून राफेलच्या क्षमतेबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली. तसेच भविष्यात इंडोनेशिया सारख्या देशांनी राफेल विमानांची खरेदी करु नये, यासाठीच कारस्थान रचण्यात आले. संघर्षात राफेल पडले, राफेल पडले, असा अपप्रचार चीनने केल्याचे गुप्तचरांनी स्पष्ट केले.. भविष्यात राफेलला चीनची लढाऊ विमाने पर्याय ठरावीत, यासाठी चीनचा खटाटोप असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles