पोलिस अंमलदाराची गळफास घेऊन आत्महत्या   

पुणे : पोलिस मुख्यालयात नियुक्तीस असलेल्या पोलिस अंमलदाराने राहत्या घरी टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेऊऩ आत्महत्या केली. स्वारगेट पोलिस वसाहतीमध्ये मित्रांसोबत ते राहत होते. हा प्रकार सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आला. स्वरुप विष्णु जाधव असे आत्महत्या केलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे.जाधव हे मुळचे कोल्हापूर येथील कसबा बावडा येथे राहणारे आहेत. कोल्हापूरला त्यांचे आईवडिल राहतात. ते २०२३ मध्ये पुणे पोलीस दलात भरती झाले होते. स्वरुप जाधव हे स्वारगेट पोलिस वसाहतीमध्ये मित्रांसोबत रहात होते. 
 
याबाबत, पोलिस नियंत्रण कक्षाला दुपारी २ वाजून ११ मिनिटांनी माहिती मिळाली. त्यानंतर, खडक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. हॉलमधील खिडकीच्या अँगलला त्यांनी टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वरूप जाधव यांच्या आत्महत्येबाबत त्यांच्या खोलीमध्ये कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. त्यांनी आत्महत्येविषयी मोबाईलमध्ये काही लिहून ठेवले आहे का?, याची माहिती मोबाईल अनलॉक करुन घेण्यात येत असल्याचे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले. 

Related Articles