राज्यात जलजीवन योजना धीम्या गतीने मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली   

विजय चव्हाण

मुंबई :  जलजीवन कार्यक्रमांतर्गत राज्यात एकूण ५१,५५८ योजना मंजूर असून २५,५४९ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत ९४५ योजनांपैकी १०२ योजना पूर्ण झाल्या असून उर्वरित ८४३ योजना प्रगतीपथावर आहेत. जनजीवन मिशन कामांची गती ही जागेची उपलब्धता, स्थानिकांचा विरोध विविध विभागांच्या परवानग्या कंत्राटदारांकडून होणारी दिरंगाई, अपुरा निधी या कारणांमुळे मंदावलेला आहे, अशी कबुली राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली.
 
प्रज्ञा सातव आणि इतरांनी याबाबत प्रष्न विचारला होता. सातव म्हणाल्या की, ‘हर घर नल, हर घर जल’ ही पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. पण, अनेक ठिकाणी ही योजना अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे पंतप्रधानांची घोषणा प्रत्यक्षात आलेली नाही. २०१९ मध्ये ही योजना सुरू झाली. सहा वर्षे झाली तरी राज्यातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचा हंडा अजूनही उतरलेला नाही. पाण्यासाठी त्यांना अजूनही पायपीट करावी लागत आहे. पाणी नाही तेथे विहिरी खणल्या गेल्या आहेत. जलजीवन योजनेचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे.  आता राहिलेल्या योजना कधी पूर्ण करणार असा प्रश्न सातव यांनी केला. 
 

Related Articles