सामानाची बांधाबांधी झाली; चंद्रचूड बंगला सोडणार   

नवी दिल्ली : सामानाची बांधाबांधी झाली आहे. मी, पत्नी अणि मुलींसह लवकरच सरकारी बंगला सोडणार आहे, असे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी स्पष्ट केले.सरन्यायाधीशपदी नियुक्तीनंतर कृष्ण मेनन मार्गावर चंद्रचूड यांना सरकारी बंगला क्रमांक ५ दिला होता. निवृत्तीनंतर त्यांनी निर्धारित वेळेत तो सोडणे आवश्यक होते. मात्र, तसे काही कारणांमुळे झाले नव्हते. चंद्रचूड, पत्नी कल्पना आणि दोन दिव्यांग मुली प्रियांका आणि माही यांच्यासोबत तेथे राहात होते. त्यांना निवृत्तीनंतर बंगला सोडण्याची सूचना न्यायालयाच्या प्रशासनाने केली होती. दररम्यान, चंद्रचूड यांनी काल सांगितले की, सर्व सामानाची बांधाबांधी आता झाली आहे. त्यापैकी काही सामान नवीन बंगल्यात गेले देखील आहे. काही गोदामात ठेवले आहे. 
 
दरम्यान, चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश होते. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी ते निवृत्त झाले होते. त्यामुळे नियमाप्रमाणे त्यांना दिलेला सरकारी बंगला सोडणे क्रमप्राप्त झाले होते. तशी सूचना न्यायालयाच्या प्रशासनाने केली होती. बंगला सोडण्यास विलंब होण्याचे कारणही त्यांनी दिले होते. त्यात म्हटले होते की, दोन मुली दिव्यांग आहेत. त्यामुळे मी व्हिलचेअरसाठी योग्य असलेल्या बंगल्याच्या शोधात होतो. 

Related Articles