दलाई लामा यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा   

चीन संतापला!

बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यावरुन, चीन संतापला असून दलाई लामा यांच्या समारंभात भारतीय अधिकार्‍यांनी उपस्थिती लावल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. तिबेटशी संबंधित चीनची संवेदनशीलता भारताने समजली पाहिजे, असेही चीनने म्हटले आहे. तिबेटशी संबंधित चीनची भूमिका स्पष्ट असून ती सर्वांना माहिती आहे, असे चीनचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितली. पंतप्रधान मोदी यांनी दलाई लामा यांना वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि समारंभातील वरिष्ठ भारतीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर माओ यांनी चीनची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Related Articles