धोनीने रांचीमध्ये मित्रांसोबत साजरा केला ४४ वा वाढदिवस   

मुंबई : माजी भारतीय विकेटकीपर-फलंदाज महेंद्रसिंग धोनी सोमवारी ४४ वर्षांचा झाला आहे. रांचीमध्ये आपल्या मित्रांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ १८ महिने जगातील अव्वल संघ होता. गेल्या महिन्यात धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेम २०२५ मध्ये समावेश करण्यात आला. 
 
धोनी म्हणाला, आयपीएलमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाची मी घई करणार नाही. मला निर्णय घेण्यासाठी चार-पाच महिने आहेत. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दरवर्षी अधिक प्रयत्न करावे लागतात. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. तेथे तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागते. तुमची तंदुरुस्ती कशी आहे आणि तुम्ही संघात किती योगदान देऊ शकता, संघाला तुमची गरज आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे त्याने नमूद केेले.
 
एमएस धोनीने रांचीमध्ये आपल्या मित्रांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. धोनीने अतिशय साधेपणाने आपला वाढदिवस साजरा केला. धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे टेनिसचे प्रशिक्षक आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील उपस्थित होते. या व्हिडीओमध्ये धोनी केक कापताना दिसून येत आहे. केप कापल्यानंतर धोनीने स्वत: आपल्या हाताने आपल्या मित्रांना केक खाऊ घातला.

Related Articles