मंचर बाजार समितीमध्ये भुईमूग शेंगांची आवक   

मंचर,(प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे सोमवारी तरकारी शेतमालाची एकूण ८९८७ डाग इतकी आवक झाली. भुईमूगशेंगा शेतमालाला दहा किलोला ४०० ते ७३० असा बाजारभाव मिळाला तसेच पावसामुळे तरकारी शेतमालाची आवक घटली, अशी माहिती बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिली.
 
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारची तरकारी आंबेगाव, खेड जुन्नर, पारनेर, शिरूर या भागातून  होते. मोठ्या प्रमाणावर शेतकरी तरकारी या शेतमालाची आवक विक्रीसाठी घेऊन येत असतात.मंचर बाजार समितीचे वैशिष्ट्य म्हणजे तरकारी शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतमालाचे वजन, बाजारभाव व एकूण रक्कम याचा एसएमएस मोबाईल अ‍ॅप द्वारे त्यांच्या मोबाईलवर लगेच कळतो ही विश्वासार्हता शेतकर्‍यांना असल्याने पाच तालुक्यातून शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात, असे सभापती निलेश थोरात यांनी सांगितले.

Related Articles