बिबट्याचा शेतकर्‍यांवर हल्ला; चार जखमी   

सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेतकरी गंभीर जखमी झाले. मळेवाड प्राथमिक उपकेंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे पाठवण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे. 
 
प्रभाकर राऊळ, सूर्यकांत सावंत, पंढरी आजगावकर आणि आनंद न्हावी अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे चौघेही माळेवाड येथील रहिवासी आहेत. 
मळेवाड-कोंडुरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. अधूनमधून बिबट्या दृष्टीस पडतो. रविवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान प्रभाकर मुळीक यांच्या घरामागे कुत्रा व मांजराला आपले भक्ष्य करण्यासाठी बिबट्या आला होता. त्याच्या हालचालींची चाहूल लागल्याने मुळीक यांनी घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडला असता त्यांच्यावरच बिबट्याने हल्ला केला.
 

Related Articles