टंकलेखन यंत्राद्वारे सॉफ्टवेअर कधीच चालेल का : मोदी   

जागतिक संस्थांना सुधारणा करण्याचे आवाहन 

रिओ डी जानेरो : विसाव्या शतकात टंकलेखन यंत्रे योग्य होती. ती तंत्रज्ञान बदलल्यामुळे आता कालबाह्य झाली आहेत. अशा टंकलेखन यंत्राचा वापर करुन  एकविसाव्या शतकातील सॉफ्टवेअर कधी चालेल का? असा प्रश्न  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर कार्य करणार्‍या संस्थांना केला आहे. दक्षिण गोलार्धातील देशांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी  सुधारणा कराव्यात, असा सल्ला देखील बिक्स परिषदेत दिला.
 
मोदी म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देणारे दक्षिण गोलार्धातील देश नेहमीच दुटप्पी भूमिकेचे शिकार झाले आहेत. त्यांना निर्णयप्रक्रियेत कधीच समावून घेतले जात नाही. त्यामुळे अशा विषयावर ब्रिक्स संघटनेने तातडीने जागतिक संस्थांत बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे  मोदी यांचा रोख संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद, जागतिक व्यापार संघटना आणि अन्य आर्थिक संघटनांच्या दिशेने होता. बदलते तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात जागतिक संस्थांत गेल्या ८० वर्षांत तिळमात्र सुधारणा झालेली नाही. त्या २० व्या शतकातील विचारानुसार  कार्यरत आहेत  एकविसाव्या शतकातील सॉफ्टवेअर हे विसाव्या शतकातील टंकलेखन यंत्राने कधीच चालविता येणार नाही, जागतिक संस्थांसाठी दक्षिण गोलार्ध म्हणजे मोबाइल फोन आणि सीमकार्ड असलेले जग आहेे; परंतु त्याच्याकडे नेटवर्क नाही, अशी अवस्था असल्याचे मोदी म्हणाले.

ब्रिक्स विश्वासार्ह संघटना बनावी 

दक्षिण गोलार्धाच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण होण्यासाठी ब्रिक्सने पुढाकार घ्यावा. एक  विश्वासार्ह संघटना म्हणून नावलौकीक प्राप्त करावा, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली. जागतिक सहकार्य आणि बहुध्रुवीय जगासाठी एक प्रेरक संघटना म्हणून  ब्रिक्सने कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 
ब्रिक्सच्या १७ व्या परिषदेत ’बहुपक्षीयता, आर्थिक-आर्थिक व्यवहार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता मजबूत करणे’ या विषयावर मोदी बोलत होते. ब्रिक्स संघटनेत विविधता असून बहुध्रुवीय जगावर तिचा विश्वास अधिक आहे. त्यासाठी संघटनेने एक मार्गदर्शक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. 

टंकलेखन यंत्र आणि सॉफ्टवेअर

विसाव्या शतकातील टंकलेखन यंत्राचा वापर एकविसाव्या शतकातील सॉफ्टवेअरमध्ये करता येणार नाही. 
 

Related Articles