येमेनच्या हुती बंडखोरांवर इस्रायलचा हवाई हल्ला   

बंडखोरांकडून क्षेपणास्त्रे डागून उत्तर

जेरूसालेम : येमेन येथील हुती बंडखोरांचा नायनाट करण्यासाठी आता इस्रायलने पावले उचलली असून सोमवारी ठिकाणांवर हवाई हल्ला केला. त्याला बंडखोरांनी क्षेपणास्त्रे डागून उत्तर दिले. 
 
लाल समुद्रात लिबेरियाचा ध्वज असलेल्या जहाजावर रविवारी हल्ला केला होता. त्यात जहाजाला आग लागली आणि ते समुद्रात बुडाले होते. खलाशी वाचले होते. यानंतर इस्रायलने बंडखोरांवर हवाई हल्ला केला. ग्रीकच्या मालकीचे  मॅजिक सी जहाजावर ड्रोनने बाँब हल्ले केले होेते. अमेरिकेने बंडखोरांवर आक्रमक हवाई हल्ले देखील चढविले होते. त्यामुळे हुती बंडखोरांनी जहाजांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. एकीकडे इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदीची चर्चा वेगाने सुरू असताना येमेन बंडखोरांवर हवाई हल्ले करण्याचे सत्र आता इस्रायलने सुरू केले आहे. इराण आणि इस्रायल संघर्षावेळी अमेरिकेने इराणच्या अणु प्रक़ल्पावर हल्ला केला होता. युद्धबंदी झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिका दौरा निश्चित केला आहे. दरम्यान इस्रायलच्या ताज्या हवाई हल्ल्यात येमेनच्या होडीडा, रॅस इसा आणि सलिफ बंदरांना लक्ष्य केले. या बंदराचा वापर बंडखोरांकडून मालवाहू जहाजांवरील हल्ल्यासाठी प्रामुख्याने केला जात आहे. ते रोखण्यासाठी अमेरिकेपाठोपाठ इस्रायलने सुरुवात केली. 
 

Related Articles