विधी महाविद्यालय अकरा दिवसानंतर सुरू   

कोलकाता अत्याचार प्रकरण 

कोलकाता : पहिल्या वर्षातील विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर सोमवारी अकरा दिवसानंतर दक्षिण कोलकाता येथील विधी महाविद्यालय कडेकोट सुरक्षेत पुन्हा सुरु झाले.
 
उप प्राध्यापिका नयना चॅटर्जी यांनी सांगितले की, बीए एलएलबीच्या पहिल्या सत्रातील ज्या विद्यार्थ्यांनी अजून परीक्षा अर्ज भरले नाहीत. त्यांना पहिल्या दिवशी हजर राहण्यास सांगितले. आवारात ज्येष्ठ पोलिस अधिकारी सुरक्षेचा आढावा घेताना आणि खासगी रक्षक विद्यार्थ्यांची ओळखपत्रे तपासताना दिसले. काल सकाळी १० वाजता महाविद्यालयाचे प्रवेशद्वार उघडण्यात आले. सुमारे १०० विद्यार्थी पालकांसह आले होते. 
 
दुपारी दोन नंतर एकही विद्यार्थी आवारात दिसणार नाही, अशी नोटीसही महाविद्यालयाने काढली होती. पहिल्या दिवशी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर परिसर सोडावा, असेही त्यांना सांगण्यात आले. 
 
प्रकरणातील दोषी सदस्य आणि अशैक्षणिक कर्मचारी यांना निर्धारित वेळेत प्रवेशबंदी केली होती.. शिक्षकांनी यापूर्वी सांगितले की होते की, महाविद्यालयाचे कामकाज ४ वाजेपर्यंत सुरू राहील.
 
महाविद्यालयात विद्यार्थिनीवर २५ जून रोजी सामूहिक अत्याचार झाला होता. प्रमुख आरोपी मोनोजित मिश्रा असून तो माजी विद्यार्थी आणि महाविद्यालयाचा कर्मचारी देखील आहे. त्याने व अन्य दोघांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे. सर्व जण तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित आहेत. सुरक्षा रक्षकासह चौघांंना पोलिसांनी अटक केली आहे. अत्याराच्या घटनेनंतर २९ जून रोजी जोरदार निदर्शने झाली होती. त्यानंतर महाविद्यालय बंद करण्यात आले होते.
 

Related Articles