शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य : मिसाळ   

पुणे : स्कूल बस आणि व्हॅनमधून होणार्‍या शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, या विषयीच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी वाहनचालक, शिक्षक पालक आणि प्रशासनाने जागरूक राहिले पाहिजे असे मत परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.पर्वती विधानसभा मतदारसंघातील दोन हजार विद्यार्थ्यांना मिसाळ यांच्या हस्ते शालेय साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मिसाळ बोलत होत्या. माजी नगरसेवक महेश वाबळे आनंद रिठे यांनी संयोजन केले.
 
मिसाळ म्हणाल्या, वाहनचालक आणि कर्मचार्‍यांची दर आठवड्याला अल्कोहोल चाचणी, पोलिस पडताळणी, अपघात किंवा गुन्ह्याचा इतिहास तपासणी, वाहनांमध्ये जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा, पॅनिक बटन, अग्नी नियंत्रण स्प्रिंकलर, महिला अटेंडंट आदी बाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. स्कूल बसचालकांनी या नियमावलीची जबाबदारीने अंमलबजावणी करावी.

Related Articles