सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कौतुक सोहळा   

पुणे : यंदा जागतिक पातळीवरील क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जगात ५६६ वे  स्थान मिळविले आहे. तसेच विद्यापीठास भारतातील एकूण सार्वजनिक विद्यापीठांमध्ये दुसरे मानांकन मिळाले आहे आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये पहिले मानांकन मिळाले आहे. त्या विषयी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाचे कुलगुरू, कुलगुरू, कुलसचिव यांचे तसेच सर्व पदाधिकारी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व सर्व सहभागी घटकांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर जगभरातील पहिल्या पाचशे विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठांचा नंबर येण्याचे आपले उद्दिष्ट असून, त्या दिशेने यशस्वी वाटचाल करण्यासाठी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पाचशे च्या आतील क्रमवारीमध्ये येण्यासाठी शासन स्तरावरील सर्व मदत करण्याचे आश्वासन इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील सभागृहातील आयोजित विद्यापीठाच्या कौतुक सोहळ्यामध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. 
 
यावेळी विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे ,विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, संविधानिक अधिकारी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक सहभागी झाले होते. विद्यापीठाचे शिक्षकेतर कर्मचारी व इतर संबंधित घटकांसाठी लवकरच दुसर्‍या टप्प्याचे आयोजन करण्यात येणार आहे. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी प्रास्ताविक केले. विद्यावानीचे संचालक श्रीदत्त गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.  कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे यांनी आभार मानले.

Related Articles