अमली पदार्थ बाळगणार्‍यास अटक   

पुणे : मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ बाळगणार्‍या मुंबईतील एका व्यक्तीला फरासखाना पोलिसांनी अटक केली. पोलिसांन त्याच्याकडून दोन ग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल संच, रोकड असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संदीप सुकनराज जैन (वय ४२, भुलेश्वर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
फरासखाना पोलिसांचे पथक बुधवार पेठेत शनिवारी दुपारी गस्त घालत होते. त्यावेळी जैन हा एका पानपट्टीजवळ थांबला होता. त्याच्याकडे मेफेड्रोन (एमडी) असल्याची मााहिती पोलीसांना खबर्‍याकडून मिळाली. त्यावरून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जैन याला पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून दोन ग्रॅम २४ मिलिग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल, तसेच पाच हजार ६२० रुपये असा मुद्देमाल जप्त केला.  जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत ४५ हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जैन याने मेफेड्रोन कोठून आणले, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.जैन याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बुधवार पेठेत मेफेड्रोनची विक्री केल्याप्रकरणी एका कुंटणखाना मालकिणीसह तिच्या भावाला अमली पदाार्थ विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती. कुंटणखाना मालकीण आणि तिचा भाऊ हे देहविक्री करणार्‍या महिलांकडे येणार्‍या ग्राहकांना तसेच महिलांना मेफेड्रोन विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली होती.

Related Articles