बाळाची विक्री करणार्‍या आई-वडीलांसह सहा जणांना अटक   

पुणे : साडेतीन लाख रूपयांमध्ये आई-वडीलांनीच पोटच्या मुलीची विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली.
 
मीनल ओंकार सपकाळ (वय ३०) ओंकार औदुंबर सपकाळ (वय २९, दोघे रा. बिबवेवाडी), साहिल अफजल बागवान (वय २७, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (वय ३४), सचिन रामा अवताडे (वय ४४, दोघे रा. येरवडा), दीपाली विकास फटांगरे (वय ३२, दोघे रा. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बाल न्याय अधिनियमनांसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
 
मीनल सपकाळ ही पहिल्या पतीपासून वेगळी राहत आहे. तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. ती सध्या ओंकार सपकाळ याच्यासोबत राहतेे.  मीनल हीला २५ जून २०२५ रोजी मुलगी झाली. मीनलला मुलगी झाल्यानंतर मध्यस्थ बागवान, पानसरे, अवताडे यांनी तिच्याशी संपर्क साधला. त्यांनी तिची ४० दिवसांची मुलगी दीपाली फटांगरे हिला देण्यास सांगितले. त्याबदल्यात साडेतीन लाख रुपये देतो, असे आमिष मध्यस्थांनी दीपालीला दाखविले. मध्यस्थांनी दोन लाख रुपये सपकाळ दाम्पत्याला दिले. मधस्थांना फटांगरेने जास्त रकम दिल्याचा संशय सपकाळ यांना आला. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.
 
दरम्यान, सपकाळ येरवडा पोलीस ठाण्यात गेले. आमची मुलगी पळवून नेली असे सांगितले. पोलिसांनी तपास करून मध्यस्थ आणि मुलगी विकत घेणारी दीपाली फटांगरे यांना ताब्यात घेतले. चौकशीत आई-वडिलांनी मध्यस्थांमार्फत बालिकेची फटांगरेला विक्री केल्याचे उघडकीस आले. फटांगरेला हिला कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया पार न पाडता साडेतीन लाख रुपयांत सपकाळने विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी सपकाळ यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली.
 
सुरुवातील मुलगी पळवून नेल्याची तक्रार देण्यासाठी सपकाळ आले होते. चौकशीत सपकाळ यांनी तिची मध्यस्थांमार्फत फटांगरे सााडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणात पोलीस फिर्यादी झाले असल्याचे येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.

Related Articles