विश्वकल्याणासाठी मानवी मूल्ये जपा   

वाढदिवसानिमित्त दलाई लामांवर शुभेच्छांचा वर्षाव

धर्मशाला : तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांचा ९० वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे हजारो भक्तगण  हिमाचल प्रदेशात धर्मशाला येथील मुख्य दलाई लामा मंदिर, त्सुगलागखांग येथे आले होेते.  जगभरातील तिबेटी नागरिकांनी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या वेळी दलाई लामा यांनी विश्वकल्याणासाठी चार सूत्री कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले. त्यामध्ये मानवी मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले. 
 
दलाई लामा यांच्या वाढदिवसानिमित्त खास नऊ थराचा केकही तयार केला होता. गेल्या काही दिवसांपासून गॅडन फोडरंग ट्रस्ट रद्द करण्याचा विचार दलाई लामा यांनी सुरू केल्याची चर्चा होती. नंतर त्यांनी तिबेटसाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद असल्याचे सांगितले होते.  या पार्श्वभूमीवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भक्तांनी रांगा लावल्या होत्या. तिबेटियन बौद्ध, शाळकरी मुले, विविध बौद्ध धर्मिय देशांतील नृत्य कलाकार आणि गायक कार्यक्रमात  सहभागी झाले. विविध देशांतील राजकीय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
 
केंदीय मंत्री किरण रिज्जिजू आणि राजीव रंजन सिंह, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू. सिक्कीमचे मंत्री सोनम लामा, हॉलीवूडचे अभिनेते रिचर्ड गियर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच रिचर्ड यांनी मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला. अमेरिकचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिटंन, बराक ओबामा यांनी चित्रफितीद्वारे दलाई लामा यांना शुभेच्छा दिल्या. गृहसचिव मार्को रुबिओ यांनी खास शुभेच्छा संदेश पाठवला आहे. 

जगासमोरील आव्हाने आणि चतु:सूत्री 

दलाई लामा यांनी या प्रसंगी चार प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सला दिला. त्यामध्ये विश्वाच्या कल्याणासाठी मानवी  मुल्यांची जपणूक, धार्मिक सौहार्द, तिबेटियन संस्कृतीचे जतन पर्यावरण रक्षण आणि भारतीय ज्ञानाचा अभ्यास यांचा समावेश आहे. त्याद्वारे विश्वकल्याण होईल, असा आशावाद त्यांनी प्रकट केला. हिंसाचार, शस्त्राची चढाओढ, व्यापार युद्ध, समाजाचे तुकडे, मुल्ल्यांचा र्‍हास आणि वातावरणातील बदल या बाबी जगासमोर आव्हान आहेत. त्यावर वेळी आवर घातला नाही तर पृथ्वीवरचे जीवन संकटात सापडेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. 
 

Related Articles