E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बळीराजाला सुखी ठेव...
Samruddhi Dhayagude
07 Jul 2025
मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे, सपत्निक महापूजा
सोलापूर, (प्रतिनिधी) : पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले.
आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी कैलास दामु उगले, कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अमृता फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री पंकज भोयर, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वारीची परंपरा वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने नवा विक्रम केला आहे. मोठ्या प्रमाणात वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले. ज्या दिंड्या आहेत, त्या सोबत तर वारकरी आलेच; परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषत: त्यात तरुणांची संख्या मोठी आहे. शासन व प्रशासनाने वारकर्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केले. त्यामुळे वारकर्यांसाठी चांगली व्यवस्था झाली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करताना नवी ऊर्जा मिळते. वारीने भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे. ही आपली संस्कृती अलौकिक आहे, असे सांगून मानाच्या वारकर्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, अशी सदिच्छा फडणवीस यांनी व्यक्त केली. निर्मल वारीतून अतिशय चांगली आवश्यक व्यवस्था उपलब्ध केल्याने कुठेही अस्वच्छता दिसली नाही. निर्मल वारी सोबत हरित, पर्यावरणपूरक वारीदेखील झाली. खर्या अर्थाने आपल्या संतांनी जो स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे तो या वारीमध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. राज्याच्या गतीमध्ये अध्यात्मिक प्रगती महत्त्वाची असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासाने कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रस्ताविक केले. आषाढी वारीमध्ये शासन व जिल्हा प्रशासनाने वारकर्यांसाठी खूप चांगल्या सुविधा दिल्यामुळे वारकरी वर्ग समाधानी असून वारकर्यांची संख्या वाढली आहे व त्यावर योग्य नियंत्रण ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी मु.पो. जातेगांव ता. नांदगांव जि. नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांच्या हस्ते महापूजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायी स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणार्या दिंड्यांचा ’श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक - श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक १३, जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा. द्वितीय क्रमांक - श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक १९, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. तृतीय क्रमांक - श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक २३, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.
Related
Articles
धुळीचा त्रास उंबरठ्यावर शिक्रापूर-न्हावरे महामार्गावर धुळीचे संकट
21 Jul 2025
थायलंड-कंबोडियाच्या सैन्यात गोळीबार
25 Jul 2025
उपमुख्यमंत्री शिवकुमारांचे नाव घेण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा नकार
21 Jul 2025
अॅपद्वारे 57 लाखांची फसवणूक
25 Jul 2025
आम्हाला रोहित-विराटची उणीव भासते : राजीव शुक्ला
23 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
धुळीचा त्रास उंबरठ्यावर शिक्रापूर-न्हावरे महामार्गावर धुळीचे संकट
21 Jul 2025
थायलंड-कंबोडियाच्या सैन्यात गोळीबार
25 Jul 2025
उपमुख्यमंत्री शिवकुमारांचे नाव घेण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा नकार
21 Jul 2025
अॅपद्वारे 57 लाखांची फसवणूक
25 Jul 2025
आम्हाला रोहित-विराटची उणीव भासते : राजीव शुक्ला
23 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
धुळीचा त्रास उंबरठ्यावर शिक्रापूर-न्हावरे महामार्गावर धुळीचे संकट
21 Jul 2025
थायलंड-कंबोडियाच्या सैन्यात गोळीबार
25 Jul 2025
उपमुख्यमंत्री शिवकुमारांचे नाव घेण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा नकार
21 Jul 2025
अॅपद्वारे 57 लाखांची फसवणूक
25 Jul 2025
आम्हाला रोहित-विराटची उणीव भासते : राजीव शुक्ला
23 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
धुळीचा त्रास उंबरठ्यावर शिक्रापूर-न्हावरे महामार्गावर धुळीचे संकट
21 Jul 2025
थायलंड-कंबोडियाच्या सैन्यात गोळीबार
25 Jul 2025
उपमुख्यमंत्री शिवकुमारांचे नाव घेण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा नकार
21 Jul 2025
अॅपद्वारे 57 लाखांची फसवणूक
25 Jul 2025
आम्हाला रोहित-विराटची उणीव भासते : राजीव शुक्ला
23 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर