व्हॉट्सऍप कट्टा   

आजकालच्या मुलांना हे कधीच कळणार नाही पूर्वीच्या काळी खालील कारणांसाठी पण मार मिळत असे! 
 
१. मारल्यावर रडल्याबद्दल. 
२. मारल्यावर न रडल्याबद्दल. 
३. न मारता रडल्याबद्दल. 
४. मित्रांबरोबर खेळल्याबद्दल. 
५. मित्रांबरोबर न खेळल्याबद्दल. 
६. मोठी माणसे बसली असताना तिथून ये जा केल्याबद्दल. 
७. मोठ्यांना उत्तर दिल्याबद्दल 
८. मोठ्यांना उत्तर न दिल्याबद्दल. 
९. खूप वेळ मार न खाता राहिल्यावर. 
१०. उपदेशपर गाणं गायल्याबद्दल. 
११. पाहुण्यांना नमस्कार न केल्याबद्दल. 
१२. पाहुण्यांसाठी केलेला खाऊ खाल्ल्याबद्दल. 
१३. पाहुणे जायला निघाल्यावर त्यांच्या बरोबर जाण्याचा हट्ट केल्याबद्दल. 
१४. खायला नाही म्हंटल्यावर. 
१५. सूर्यास्तानंतर घरी आल्यावर. 
१६. शेजार्‍यांकडे खाल्ल्याबद्दल. 
१७. हट्टी असल्याबद्दल. 
१८. खूप उत्साही असल्याबद्दल. 
१९. बरोबरच्या मुलांमध्ये भांडणात हरल्याबद्दल. 
२०. बरोबरीच्या मुलांमध्ये भांडणात जिंकल्याबद्दल. 
२१. खूप सावकाश खाल्याबद्दल. 
२२. भराभर खाल्याबद्दल. 
२३. मोठे जागे झाल्यावर झोपून राहिल्याबद्दल. 
२४. पाहुणे खात असताना त्यांच्याकडे बघत राहिल्याबद्दल. 
२५. चालतांना घसरून पडल्याबद्दल. 
२६. मोठ्यांच्या कडे पाहत उभे राहिल्याबद्दल. 
२७ मोठ्यांशी बोलताना दुसरीकडे पाहिल्याबद्दल. 
२८. मोठ्यांशी बोलताना त्यांच्याकडे न पाहिल्याबद्दल. 
२९ मोठ्यांशी बोलताना एकटक पाहिल्याबद्दल 
३० रडणार्‍या मुलांकडे पाहून हसल्याबद्दल. 
----
दुसर्‍यांना दिला गेलेला सल्ला हा आपल्यासाठीच एक आरसा बनतो, जो आपल्याला स्वतःचं आकलन आणि आत्मविकास साधायला मदत करतो. जेव्हा आपण दुसर्‍यांना मार्गदर्शन करतो, तेव्हा त्या शब्दांमागील तत्त्वज्ञान, अनुभव आणि ज्ञान आपल्या स्वतःच्या जीवनात कसं लागू करता येईल, हे समजून घेतलं पाहिजे.
 
दुसर्‍यांना दिला गेलेला सल्ला हे एक प्रकारचं शुद्ध आत्ममूल्यांकन असू शकतं. आपण ज्या गोष्टी सांगतो, त्या गोष्टी आपल्या आयुष्यात काय गडद किंवा स्पष्ट आहेत, ह्याचं थोडं निरीक्षण करायला हवं. ज्यावेळी आपण इतरांना जीवनाच्या, करिअरच्या किंवा तंत्रज्ञानाच्या बाबतीत मार्गदर्शन करतो, तेव्हा आपल्याला स्वतःला त्या सल्ल्यांचा अनुसरण करायला सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे.
 
जेव्हा आपण स्वतः त्या सल्ल्यावर काम करतो, तेव्हा तो केवळ शब्दांच्या पलीकडे जाऊन आपल्या जीवनाचा हिस्सा बनतो. यशाचा खरा मार्ग म्हणजे त्याच सल्ल्यावर आत्मपरीक्षण आणि कृती करणे. आपला प्रभाव इतरांवर केवळ आपल्या बोलण्यात नसून, त्या बोलण्यातून घेतलेल्या कृतींमध्ये असतो.

Related Articles