रशियाचा हवाई तळ उडवला   

युक्रेनचा दावा

किव्ह : रशियाच्या हवाई तळावर हल्ला केल्याचा दावा युक्रेनने शनिवारी केला. रशियाने युक्र्रेनवर रात्री शेकडो ड्रोनचा वापर करुन हल्ला केला होता. त्याला हवाई तळावर हल्ला करुन सडेतोड उत्तर दिल्याचे म्हटले आहे.
 
दोन्ही देशांत गेल्या तीन वर्षांपासून भीषण युद्ध सुरू आहे. युद्धबंदी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, युक्रेनचे लष्कर प्रमुखांनी सांगितले की, सैन्याने रशियाच्या बोरीसोक्लेबस्क हवाई तळावर काल जोरदार हल्ला चढविला. तेथे सखोई ३४, सुखोई ३५ एस आणि सुखोई ३०एसएम लढाऊ विमाने होती. तेथे दिशादर्शक बाँब, प्रशिक्षण विमाने आणि अन्य काही विमाने असण्याची शक्यता आहे. त्यावर रशियाने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.  हवाई तळाला दुसर्‍यांदा लक्ष्य केल्यामुळे रशिया युक्रेनसमोर फिका पडत आहे. गेल्या महिन्यात ४० पेक्षा अधिक रशियन लढाऊ विमाने जोरदार ड्रोन हल्ला करुन नष्ट केली होती. त्यात प्रामुख्याने घातक बाँबर विमानांचा समावेश होता.
 
दरम्यान, रशियाने शनिवारी रात्री ३२२ ड्रोनचा वापर करुन हल्ला केला. त्यापैकी १६७ हवेत नष्ट केली असून  १३५ भरकटली. इलेक्ट्रिक जॅमर तंत्रज्ञानामुळे ती पडल्याने नष्ट झाल्याचे म्हटले आहे. ड्रोन हल्ल्यात युक्रेनचे नुकसान झाले नसल्याचेही सांगितले. अशाच प्रकारचा भीषण हल्ला लांब पल्ल्यांच्या विमानांचा वापर करुन रशियाने केला होता. 

Related Articles