कराची : पाकिस्तानातील कराचीच्या लियारी भागात कोसळलेल्या जुन्या निवासी इमारतीतील मृतांची संख्या शनिवारी १९ वर पोहोचली. ढिगारा हटवण्याचे काम अजूनही सुरू असल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.बचाव पथकांनी आतापर्यंत १९ मृतदेह बाहेर काढले आहेत तर सहा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती उपायुक्त दक्षिण जावेद लेघारी यांनी दिली. लियारीच्या बगदादी भागात शुक्रवारी दुपारी पाच मजली इमारत कोसळली होती. या घटनेनंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. कराचीचे महापौर मुर्तझा वहाब यांनीदेखील तातडीने घटनास्थळी भेट दिली होती. तसेच, आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असल्याचे म्हटले होते.
Fans
Followers