युनोतील कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी पाठिंबा   

मोदी यांच्या दौर्‍यात त्रिनिनादची घोषणा

पोर्ट ऑफ स्पेन : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरुपी सदस्यत्वासाठीत्रिनिनाद आणि टोबॅगोने शनिवारी भारताला संपूर्ण पाठिंबा  जाहीर केला. या संदर्भातील संयुक्त जाहीरनामा दोन्ही देशांनी काल प्रसिद्ध करण्यात आला. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्रिनिनाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी विविध क्षेत्रांसाठी सहा करार केले. त्यामध्ये पायाभूत प्रकल्प, औषध, तातडीचे प्रभावशाली प्रकल्प, संस्कृती, क्रीडा आणि राजनैतिक प्रशिक्षण यांचा समावेश आहे. संरक्षण, कृषी, आरोग्य काळजी आणि डिजिटल हस्तांतरण आणि यूपीआय तंत्रज्ञान व क्षमता वाढ या विषयांवर अधिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला. शुक्रवारच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली की, भारताकडून त्रिनिनाद आणि टोबॅगो येथे राहणार्‍या सहाव्या पिढीतील भारतीय वंंशियांना भारताचे परदेशी नागरिकत्व कार्ड दिले जाणार आहे. महिला क्रिकेटपटूंना प्रशिक्षणही भारतात  दिले जाणार आहे. दरम्यान,  या देशातील ४० टक्के लोकसंख्या मूळची भारतीय वंशाची आहे. 

Related Articles